आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष ग्रंथकार पारितोषिकांची घोषणा, इतिहासकार डॉ रामचंद्र गुहा यांच्या हस्ते 26 मे रोजी वितरण

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके रविवारी येथे जाहीर करण्यात आली. वीस लेखकांच्या साहित्यकृती पारितोषिक प्राप्त ठरल्या आहेत.

रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. ही पारितोषिके २६ मे रोजी सकाळी ११.०० वा. एस. एम. जोशी सभागृहात नामवंत इंग्रजी लेखक,इतिहासकार आणि विचारवंत पदमभूषण डॉ.रामचंद्र गुहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

पारितोषिकांसाठी कोणाची निवड?

या पारितोषिकांसाठी ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर (रा. अ. कुंभोजकर पारितोषिक), वामनराव देशपांडे (डॉ. शं. दा. पेंडसे पारितोषिक), डॉ. चैतन्य कुंटे (कृष्णराव फुलंब्रीकर पारितोषिक), डॉ. राजेंद्र दास (भा. रा. तांबे पारितोषिक), नीलम माणगावे (ना. घ. देशपांडे पारितोषिक), सविता घाटे (गो. रा. परांजपे पारितोषिक), प्रा. हरी नरके (श्रीपाद जोशी पारितोषिक), प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे (कमलाकर सारंग पारितोषिक), अरुणा सबाने (ज्योत्स्ना देवधर पारितोषिक), सम्राट फडणीस (आशा संत पारितोषिक), प्रभाकर साळेगावकर आणि स्वाती राजे (शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पारितोषिक), ऍड. जयदेव गायकवाड (सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक), अरुण नूलकर (श्रीकांत चौगुले शब्दमैफल पारितोषिक), श्रीकांत बोजेवार (मालिनी शिरोळे पारितोषिक), अरुण हरकारे (ह. ना. आपटे पारितोषिक), सुनील माळी (लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक), डॉ. नलिनी गुजराथी (ग. ह. पाटील पारितोषिक), डॉ. विलास चिंतामण देशपांडे (ताईसाहेब कदम पारितोषिक) यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.