आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:पुण्याच्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी, 16 कोटींचे इंजेक्शन देऊनही वाचू शकले नाहीत प्राण; आई-बाबांचे प्रयत्न अपयशी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) हे इंजेक्शन देण्यात आले होते.

लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची तजवीज करुनही पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. 1 ऑगस्ट सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरुवात झाली. यानंतर रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला आहे. वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे 16 कोटी रुपये जमा केले होते. मात्र पालकांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात तीरा कामत या चिमुरडीला अमेरिकेतून तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन दिल्यामुळे तिचा जीव वाचविण्यात यश मिळाले होते. त्यानंतर पुण्यातील चिमुरडी वेदिका शिंदे ही देखील या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. वेदिकासाठी देखील 16 कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले होते. पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा (Zolgensma) हे इंजेक्शन देण्यात आले होते. वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे 16 कोटीचे इंजेक्शन मिळावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती मात्र दुर्दैवाने वेदिकाने जीव गमावला आहे.

कोणता होता आजार?
वेदीका ही पाच महिन्यांची होती तेव्हा तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत चालला होता. या आजारावर उपचार करणे आवश्यक होते. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा (Zolgensma) ही एकमेव लस उपलब्ध आहे. या लसीसाठी लोकवर्गणीतून पैसे जमा करुन तिला लस देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...