आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन करत लग्न:लोनावळ्यातील एका लग्नात 100 लोकांचा सहभाग; प्रशासनाने ठोठावले 1 लाख 14 हजार रुपयांचे दंड

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे महानगर पालिकेने हॉटेलला 50 हजारांचे तर वरातीला 1 लाख 14 हजारांचा रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राज्यात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. दरम्यान, लग्नसमारंभासाठी दोन तासांचा अवधी दिला असून यामध्ये 25 लोकांना सामील होता येण्याची अट आहे. परंतु, पुणे येथील लोनावळ्यातील ग्रँड विस्वा हॉटेलमध्ये लग्नसमारंभासाठी 100 लोकांची उपस्थिती असून मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा साजरा केला जात होता. विशेष म्हणजे या लग्नसमारंभात लोकांनी सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर केलेला नव्हता. संबंधित घटनेची माहिती लोनावळा पोलिस स्टेशनला मिळताच घटनास्थळी छापा टाकण्यात आला. दरम्यान, यामध्ये आयोजकांसह हॉटेल मालकांच्या विरोधात कलम 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनाकाळात सोशल डिस्टेंसिंगचे नियम तोडल्याबद्दल पुणे महानगर पालिकेने हॉटेलला 50 हजारांचे तर वरातीला 1 लाख 14 हजारांचा रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वरातीवर प्रश्न उपस्थित
लोनावळाचे डीवायएसपी कामत यांनी सांगितले की, संबंधित वरात मुंबईतील उल्हासनगर येथील आहे. परंतु, राज्यात कोरोनामुळे लोकांना एका शहरांतून दुसर्‍या शहरात येण्यास बंदी आहे. त्यामुळे मुंबईतील वरात पुण्यात आलीच कशी यावर प्रश्न उपस्थित होत आहे. कामत यांनी सांगितले की, ट्रॅवल एजन्सीची चौकशी चालू असून यामध्ये त्याची चूक असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

प्रसिद्ध 'बाबी द पंजाबी ढाबा' सील
पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी लोणावळ्याच्या प्रसिद्ध 'बाबी द पंजाबी ढाबा'ला सील केले. कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन करत लोकांना खायला दिले जात होते. पोलिसांनी संबंधित कारवाईत ढाब्यावर दहा हजार रुपये दंडही लावला.

बातम्या आणखी आहेत...