आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर आयुक्तांची माहिती:साखर आणि इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल - शेखर गायकवाड

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावर इथेनॉलचे दर वाढल्याने ब्राझील साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढवले आहे. या गोष्टीचा भारताला फायदा झाला असून असून भारताने जगात सर्वाधिक साखरेचे उत्पादन यंदाच्या वर्षी केलेले आहे. देशात साखरेचे उत्पादन घेणे सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. देशातील एकूण निर्यात साखर उत्पादनापैकी 75 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्याची इथेनॉल निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता 264 कोटी लिटर झालेली असून ती आपण वेगाने वाढवत ब्राझीलच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी व्यक्त केली.

गायकवाड म्हणाले, यंदाचा हंगाम अतातपर्यंतचा विक्रमी हंगाम होता. राज्यात एकूण 1320.31 लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. तर साखरेचे एकूण उत्पादन 137.28 लाख टन करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा 10.40 टक्के असून सरासरी 173 दिवस ऊस गाळप झाले आहे. यंदाच्या वर्षी सर्वाधिक काळ 240 दिवस गाळप तर कमीत कमी 36 दिवस गाळप झाले आहे. राज्यात सहकारी 101 साखर कारखाने तर खाजगी 99 साखर कारखाने असे एकूण 200 कारखाने कार्यरत होते. सदर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झाला असून सध्या कुठे ही ऊस शिल्लक नाही. राज्यात ठराविक मुदती नंतर मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन झाल्याने ऊस शिल्लक होता. परंतु नियोजन करून गाळप हंगाम संपविण्यात आला आहे. पुढील वर्षीचा ऊस उत्पादन आढावा घेणे सुरू झाले असून उसाचे क्षेत्र यंदाच्या वर्षीही वाढणार आहे हे दिसते आहे.

बातम्या आणखी आहेत...