आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharastra Corona Virus Outbreak: Appeal By Minister Vijay Vadettiwar For Follow The Corona Pendemic Rules And Regulation; News And Live Updates

इशारा:काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास नव्याने कडक निर्बंध!; नियम पाळा : मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांचे आवाहन

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 10,442 नवे रुग्ण, 483 मृत्यू

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यातील काही भागांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, पुरेशी काळजी न घेता नागरिक बाहेर पडू लागल्याने तुरळक ठिकाणी पुन्हा कोरोना रुग्ण वाढल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आवश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध घालण्यात येतील, असा इशारा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी दिला.

पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक आहे. ब्रेक दि चेनच्या नव्या नियमानुसार दर शुक्रवारी त्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन बेडच्या प्रमाणानुसार निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार पुण्यातील नवे निर्बंधही जाहीर करण्यात आले. येथे सोमवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच बाजारपेठ खुली राहील. या वेळी मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण यावर बोलताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात १०,४४२ नवे रुग्ण, ४८३ मृत्यू
राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू घटते आहे. रविवारी १०,४४२ नव्या बाधित आढळले. ७ हजार ५०४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली तर ४८३ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ९५.४४ टक्क्यांवर गेले आहे. एकूण रुग्ण संख्या ५९,०८,९९२ वर गेली असून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ५६,३९,२७१ झाली आहे, तर आतापर्यंत एकूण १ लाख ११ हजार १०४ बळी गेले आहेत.

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करावी
मराठा आरक्षणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्तीचा पर्याय अवलंबून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. देशभरातील ओबीसींचे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांचा नेमका अंदाज येण्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची आवश्यकता आहे. ही जनगणना जातीनिहाय करावी, अशी आमची मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

२६-२७ जून रोजी ओबीसींचा मेळावा
ओबीसींची जनगणना तसेच इतर मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जून रोजी लोणावळा येथे ओबीसींचा मेळावा घेणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. लोकशाही समाजरचनेत प्रत्येक समाजगटाला, समाजसमूहाला न्याय्य हक्क तसेच आरक्षणविषयक मागणी करण्याचा अधिकार आहे. आम्ही तेच करत आहोत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी
जिल्हा टक्के
कोल्हापूर१६.०६
रायगड१४.९०
रत्नागिरी१३.७४
पुणे१२.१९
सातारा११.५४
सिंधुदुर्ग११.२३

बंग यांना टीका करण्याचा अधिकार
राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अभय बंग यांनी टीका केली. त्यावर डाॅ. बंग हे महान सामाजिक कार्यकर्ते आणि धुरीण आहेत. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी व्यसनमुक्तीचे कार्य केले आहे. सर्व प्रकारे टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

मराठवाड्यात ३९७ पॉझिटिव्ह, ३४ मृत्यू, ७९५ डिस्चार्ज
औरंगाबाद | मराठवाड्यात रविवारी ३९७ रुग्ण आढळले, ३४ मृत्यू झाले. ७९५ जणांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद ११३ (११ मृत्यू), जालना २२ (६), परभणी २५ (१), हिंगोली २ (००), नांदेड २० (००), लातूर ४४ (४), उस्मानाबाद ६३ (९), बीड १०८ (३).


बातम्या आणखी आहेत...