आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार:भाजप नेते किरीट सोमय्या यांचा लोणावळ्यात मंगळवारी इशारा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडीने केलेला 100 कोटी रुपयांचा कोविड घोटाळा उघड करणार असल्याचे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोणावळ्यात मंगळवारी सांगितले. लोणावळा शहर भाजपच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते आज लोणावळ्यात आले होते.

सोमय्या म्हणाले, कोविडकाळात महाविकास आघाडीने मुंबई-पुणे येथे जी कोविड सेंटर सुरू केले. त्याची कामे नेते व त्यांच्या नातेवाइकांना दिली. जी कंपनी अस्तित्वात नाहीत, तिच्या नावे काम दिले. यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला. 100 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा मुंबईत उघड करणार आहे. तत्कालीन पर्यावरणमंत्री यांनी मड आयलँड समुद्र किनाऱ्यावर 28 स्टुडिओसाठी परवानगी देत 1 हजार कोटींचा घोटाळा केला. तो देखील लवकरच उघड होईल. परिवहनमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी येथे बांधलेले रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. राज्य सरकार देखील आज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहे. मात्र येथे थांबणार नाही, हे रिसाॅर्ट बांधण्यासाठी पैसे कोठून आणले याचा पाठपुरावा करणार आहे. अजितदादांविषयी बोलताना जरांडेश्वर हा बाराशे कोटींचा कारखाना जप्त करण्यात आला आहे व कारवाई सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...