आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:महेश लांडगे, गणेश बीडकर, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी देणारा अटकेत; तरुणीने प्रेमास नकार दिल्याने केले कृत्य

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार महेश लांडगे, भाजपचे नेते गणेश बिडकर, मनसेचे वसंत मोरेंच्या मुलाला धमकी देणारा तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तरुणीने प्रेमास नकार दिल्याने हे कृत्य केल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली आहे.

पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून राजकीय व्यक्ती उद्योजक यांना लाखो रुपयांच्या खंडणी मागितल्या जात असल्याचे प्रकार वाढले होते. यात भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा यांना अज्ञात इसमाने फोन करून धमक्या देऊन त्यांच्याकडे प्रत्येकी तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या सर्वांना धमकी देणाऱ्या पाठीमागे असणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून एका मुलीने प्रेमासाठी नकार दिल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शेख (रा.घोरपडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल केंद्र चालवण्याचे तो काम करतो. त्याच्याकडे एका मुलीचे विवाह नोंदणीसाठी प्रोफाईल आले होते. मात्र, ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यास मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून रागाने या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास मागील काही दिवसांपासून सुरुवात केली.

जामीनावर सुटत पुन्हा मागितली खंडणी

मनसेचे नेते वसंत मोरे यांचे मुलास धमकी प्रकरणात या आरोपीस अटक झाली. परंतु जामीनावर सुटल्यावर त्याने पुन्हा जुने उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांना फोनवर धमक्या दिल्या. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास अटक करून चौकशी केली असता त्याने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार करत केवळ प्रियसीला त्रास देण्यासाठी कृती केल्याची माहिती दिली आहे.

नुकतेच आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भाजपचे नेते गणेश बीडकर यांना देखील 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले होते. त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देत लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी सदर खंडणीखोरांनी दिली होती. याप्रकरणी तीन विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.