आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंना 'ते' वक्तव्य भोवले:पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक; भिडेंच्या फोटोला टिकली लावत आंदोलन, पाहा VIDEO

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आधी टिकली लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, असे वादग्रस्त विधान संभाजी भिंडेंनी एका महिला पत्रकाराशी केले होते. त्यावरून भिडे यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू आहे. या गोष्टीचा निषेध करत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडे यांच्याविरोधात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे शुक्रवारी (4 नोव्हेंबरला) आंदोलन करण्यात आले.

महिला काँग्रेस आंदोलन करताना
महिला काँग्रेस आंदोलन करताना

काय म्हणाल्या तिवारी?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी म्हणाल्या, आज आपला महाराष्ट्र शाहू - फुले - आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. माँ जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, इंदिरा गांधी यांनी कुंकू न लावता आपले सामर्थ्य या देशात सिध्द केले आहे. अतंराळविर कल्पना चावला हिने ही कुंकू न लावता आपल सामर्थ्य सिध्द केले होते. आम्ही महिलांनी कुंकू लावावे का नाही हा आमचा निर्णय आणि आमचा हक्क आहे.

भिडेंनी शिकवू नये

देशामध्ये लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आपण स्वत: आपले निर्णय घेवू शकतो. संभाजी भिडेंनी आम्हाला संस्कारांचे शिक्षण देऊ नये. त्यांच्या या वक्तव्याच्या आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भिडे गुरुजी यांचा मान राखत महिलांची स्वातंत्र्याची भूमिका घेतली. मात्र, त्यांनी बिल्डिंगची पाठराखंड न करता स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भिडेंविरोधात घोषणाबाजी
भिडेंविरोधात घोषणाबाजी

नेमके प्रकरण काय?

संभाजी भिडे यांनी बुधवारी (2 नोव्हेंबरला) मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरले. एका महिला पत्रकारानेही त्यांना या भेटीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे म्हणाले. शिवाय आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते. तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असा सल्लाही त्यांनी दिला. भिडे यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय.

भूमिका स्पष्ट करावी

दरम्यान संभाजी भिडेंनी केलेल्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर महिला आयोगामार्फतही भिडेंना नोटीस देण्यात आली आहे. केलेल्या भाष्य नंतर त्यांनी आपली स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असा सरासर उल्लेख या नोटीसमध्ये केला आहे.

बातम्या आणखी आहेत...