आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कात्रज येथील नव्या बोगद्याकडे जाणाऱ्या जांभूळवाडी येथील दरी पुलावर सोमवारी रात्री तब्बल 10 ते 12 वाहने ही एकमेकांना धडकुन मोठा अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 12 ते 13 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा येथून मुंबईला जाणारी एक ट्रॅव्हल्स ही कंटेनरला धडकुन त्या पाठोपाठ तब्बल 10 ते 12 वाहने ही एकमेकांना धडकली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.
पुणे बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण आहे. सातारा बाजूने येणारी एक भरधाव वेगातील मुंबईला जाणारी एक ट्रॅव्हल्स ही या मार्गावरच एका कंटेनरला मागून धडकली. यावेळी मागून येणाऱ्या 10 ते 12 गाड्या या देखील भरधाव वेगात असल्याने एकमेकांना धडकल्या. यात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुळे 12 ते 13 जण जखमी झाले आहे.
पूलावरच हा अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. वाहनानांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहेत. काही जखमींना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे. या मार्गावरील वाहतूक ही सुरुळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 6 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 7.30 ते 9.30 आणि सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी आदेश निर्गमित केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.