आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाण, खैरेंचा सत्तारांवर हल्लाबोल:चव्हाण म्हणतात- शिक्षणमंत्रीच करा; सत्तारांच्या घोटाळ्यांच्या 4 फायली- खैरेंचा दावा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी घोटाळ्याप्रकरणातील यादीत नावे आल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह राजकारणतही मोठी खळबळ उडाली. सत्तारांच्या विरोधकांनी त्यांच्यावर आरोप आणि टीकेचा भडीमार केला असून सत्तारांना शिक्षणमंत्रीच केले जाईल अशी मिश्किल टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तर चव्हाणांच्या पोटात गोळा उठला असे संतप्त प्रत्यूत्तर दिले.

2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी 7 हजार 800 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे टीईटी घोटाळ्यातील यादीत नावे आली आहेत.

TET घोटाळा; सत्तारांच्या 4 अपत्यांचे प्रमाणपत्र रद्द:चूक असेल तर कारवाई करा, पण बदनामी करणाऱ्यांना फासावर चढवा -सत्तार

सत्तारांना शिक्षणमंत्रीच केले जाईल- पृथ्वीराज चव्हाण

हाच धागा पकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. ते म्हणाले, विधीमंडळाचे अधिवेशन येईल तेव्हा टीईटी घोटाळ्याचा प्रश्न आम्ही सभागृहात मांडणार आहोत. आता तर सत्तारांच्याच गटाचे सरकार आहे. त्यामूळे सत्तारांना शिक्षणमंत्रीच केले जाईल. राज्यात अस्थिरता निर्माण झाली की, मंत्री कुणाला करणार, कुणाला काय खाते देणार याकडेच लक्ष लागते मग घोटाळ्याकडे दुर्लक्ष होते ईतर गोष्टी लपून राहतात. राज्यातील चांगल्या प्रशासनाची परंपरा नष्ट होत आहे.

सत्तारांच्या चार फायली बाहेर काढणार- खैरे टीईटी घोटाळ्याप्रकरणात अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, आता भाजप आता सत्तार यांना मंत्रिपद देणार का? माझ्याकडे बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे सत्तार यांची फाईलच आहे. येणाऱ्या काळात त्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही खैरे यांनी दिला आहे. एक सहकारी म्हणून मी इतके दिवस शांत होतो. मात्र, आता इथून पुढे शांत बसणार नाही. त्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढणार आहे. टीईटी घोटाळ्यात अजून किती मुले मुली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. अब्दुल सत्तार यांच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद हवे असेल तर त्यांनी शांत बसावे. अधिक बडबड करू नये.

चव्हाणांच्या पोटात दुखतेय

पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना सत्तार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात काय आहे, त्यांचे पोटशूळ उठतेय, ते मला बोलायची गरज नाही. मी काँग्रेसमध्ये असतानाही पृथ्वीराज बाबांच्या पोटात दुखत होते मला त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही.

सत्तारांची खैरेंवर जोरदार टीका

अब्दुल सत्तार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मंत्रिपद, फंत्रिपद जाऊ द्या..चंद्रकांत खैरेंसारखे कमकुवत लोक आहेत. त्यांच्याकडे जे काय मटेरीयल आहे, किती फायली आहेत तर त्याला पोकलेन, जेसीबी लागते का? त्यांच्याकडे जे आहे ते द्यावे.

पेडणेकरांची सत्तारांवर टीका

सत्तारांच्या अपत्यांची टीईटी घोटाळ्यातील यादीत नावे आली त्यानंतर टीका करताना शिवसेनेच्या मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, सर्व वाशिंगमशीनमध्ये गेले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगायचे? जे ईडीला काडी लावून गेले त्यांच्याबद्दल काय बोलावे, शासन म्हणून ते काय करीत आहेत, केंद्र म्हणून, कायदा म्हणून आणि संविधान म्हणून हे काय करीत आहेत तर सर्वाचीच तोडमोड करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...