आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभव्य दिव्य चित्ररथाची आकर्षक मांडणी, ढोल-ताशा आणि लेझीम पथकासह शंखनाद, रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या अशा चैतन्यदायी वातावरणात काढलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले दांपत्य सन्मान महारॅलीव्दारे फुले दांपत्याचा जीवनपट उलगडला. निमित्त होते माळी महासंघातर्फे दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) दरम्यान काढण्यात आलेल्या फुले दांपत्य सन्मान महारॅलीचे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांसाठीशिक्षणाची द्वारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे (शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने फुले दांपत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कधी बांधला फुले वाडा
जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. तेथेच त्यांचा जन्म झाला. महात्मा फुले वाडा, पुणे. याच ठिकाणी महात्मा जोतिराव फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत आयुष्यातील काही काळ राहिले होते. हा वाडा १८५२ मध्ये बांधला होता.
हे माहीतेय का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.