आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉंग्रेस अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे. तसेच मनीकांत राठोड यांना ताबडतोब अटक करण्यात यावी असे निवेदन पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा मल्लिकार्जुन खर्गे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय जनता पार्टीचे चित्तापूर (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मनीकांत राठोड हा गुन्हेगार प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यामुळे खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या जीवाला धोका संभवत असल्याचे दिसते असे निवेदनात नमूद असून निवेदन पोलिस प्रशासनाला देताना नगरसेवक अजित दरेकर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी या उपस्थित होत्या.
उद्योजकाच्या बंगल्यातून चंदनाची सहा झाडे कापून नेली
मुंढवा परिसरातील एका उद्योजकाच्या बंगल्यातून चंदनाच्या सहा झाडांचे बुंधे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी उद्योजक राहुल मेहता (वय ३५, रा. मुंढवा,पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उद्योजक मेहता यांचा मुंढवा भागात डेक्कन पेपर मिल बंगला आहे. चोरटे मेहता यांच्या बंगल्यात शिरले. मेहता तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या व्यंकटेश फ्लोरा सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाच्या सहा झाडांचे बुंधे कापून नेले. पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.