आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बंगळुरू येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्या समवेत होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ऐतिहासिक ठरलेल्या या पोटनिवडणुकीची संपूर्ण माहिती घेतली आणि रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन करून म्हटले की, दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे. महागाई, बेकारी यामुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे.
त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करून भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आगामी काळातही महाविकास आघाडीच्या रोपाने भाजपसारख्या जातीवादी प्रतिगामी पक्षाचा पूर्ण पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच मोहन जोशी यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
महिला योजनांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी - आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी
विविध विभागांच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणार्या योजनांची अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रस्तावित महिला धेारणावर विधानसभेत चर्चा करताना केली.
मिसाळ म्हणाल्या, महिला धोरण केवळ पुस्तकात राहू नये, त्याची जनजागृती करावी, त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. या आधीच्या धोरणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात यावा. प्रत्येक खात्यावर त्याची जबाबदारी टाकावी आणि दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा. मुलींचे आरोग्य आणि लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी शालेय स्तरावर जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असावेत.
पीडित महिलांसाठी कायदा केंद्र, हेल्पलाइन सुरू करावी. त्यांच्यासाठी निवार्याची सुविधा द्यावी. स्वयंरोजगारासाठी शासनाने नोकरी फेअर, कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवावेत.संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुदान तुटपुंजे असून त्यात वाढ करावी. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा वाढावी. या महिलांची मुले १८ वर्षांची झाल्यानंतर अनुदान बंद होते. ही वयोमर्यादा वाढविण्यात यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.