आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील एका साेसायटी संस्थेचे फेरलेखापरीक्षण करताना सहकार विभागातील लेखापरीक्षक आणि प्रशासक यांनी दाेन लाख दाेन हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाेघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिलीे लेखापरीक्षक किरण चाैधरी आणि प्रशासक हरुन सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे.
याप्रकरणी सहकार विभागाचे वर्ग एकचे अधिकारी अपर लेखा परीक्षक महेश चंद्रकांत जाधव (वय-55) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे अप्पर लेखापरीक्षण श्रेणी सहकारी संस्था, पुणे येथे विशेष लेखापरीक्षक पदावर काम करत आहे. 16/6/2017 राेजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यल्लाे ब्लाॅसम सहाेरी गृहरचना संस्था, बी.टी.कवडे राेड,घाेरपडी,पुणे या संस्थेचे 2011-12 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश प्राप्त झाले हाेते.
याबाबत तक्रारदार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पुणे यांचे फेरलेखापरीक्षण पूर्ण करुन वैधानिक लेखापरीक्षक किरण चाैधरी व प्रशासक हरुन सय्यद यांनी दाेन लाख दाेन हजार रुपये रक्कमेचा अपहार केले असल्याचा फेरलेखापरीक्षण अहवाल 27/9/2022 राेजी उपनिंबधक पुणे शहर सहकारी संस्था यांचेकडे सादर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.
ग्राहकाचे दुकान मालक महिलेसमोरच हस्तमैथुन
कपडे खरेदीच्या निमित्ताने दुकानात आलेल्या एका ग्राहक तरुणाने दुकान मालक महिसेसमोर हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात व्यावसायिक 23 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. 14 डिसेंबर रोजी दुपारी मेन्स अँड वूमेन्स या कपड्यांच्या दुकानात ही घटना घडली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील नॉर्थ मेन रोडला हे दुकान आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दुकानात एकजन कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने आत शिरला. तक्रारदार या दुकानात एकट्या होत्या. त्याने कपडे दाखविण्यास सांगत त्यांना बोलण्यास सुरूवात केली. तसेच, त्यांचे नाव आणि मोबाईल क्रिमांक विचारून घेतला. त्यानंतर ट्रायल रूममध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे पाहून एका हाताने इशारा केला. तसेच, त्यांच्यासमोर हस्तमैथुन केले दरम्यान तरुणी भंयकर चिडली तिचा रुद्रावतार पाहून तो दुकानातून पळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.