आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?:पुण्यात लिंबू-सरबत विक्री करणाऱ्याची चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर लिंबू सरबत विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्यालगत परिसरात ही घटना घडली असून, गुरुवारी उघडकीस आली आहे. विलास तुकाराम खामकर (वय 46,रा.आंतकरवाडी, ता. हवेली, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

सदर आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पाेलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार दारूचे व्यसन व काैटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विलास खामकर यांना दारूचे व्यसन हाेते. दारू पिऊन घरी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबातील व्यक्तींसाेबत वाद हाेत. बुधवारी त्यांचा वाढदिवस हाेता आणि वाढदिवसाच्या दिवशी ही ते दारू प्यायले हाेते. त्यामुळे त्यांचे घरी गेल्यानंतर पत्नीशी भांडण झाले व ते घरातून रागात निघून गेले हाेते. त्यानंतर त्यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच, हवेली पाेलिस ठाण्याचे पाेलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह झाडावर उतरवत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत पुढील तपास हवेली पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...