आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे शहरातील विमान नगर परिसरात मोटारसायकलवरुन घरी जात असलेल्या 54 वर्षीय केमिस्टला एका वेगवान कारने आधी टक्कर मारली, नंतर अंगावर गाडी घालून फरार झाला. तीन दिवस हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंझ दिल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपीला अद्याप पोलिस पकडू शकले नाहीत.
घटनास्थळावरील कॅमेरात कैद झाली घटना
विश्रांतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 वाजता अनिल विठ्ठलराव शाहकार, यांचा लेन नंबर 13, टिंगरे नगरमध्ये अपघात झाला. घटनास्थळावरील कॅमेरात हा भयंकर घटनेचा व्हिडिओ कैद झाला. यात कारने आधी अनिल यांना टक्कर मारली आणि नंतर त्यांच्या अंगावरुन कार घालुन आरोपी फरार झाला. स्थानिकांनी त्यांना जवळील एका खासगी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले, फर्स्ट एड केल्यानंतर त्यांना बुधरानी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पण, त्यांची मृत्यूशी झुंझ अपयशी ठरली आणि रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली आणि तपास सुरू केला. पण, अद्याप पोलिसांच्या हाती यश आले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.