आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारदारच निघाला खुनी:गर्लफ्रेंडचा केला खून, लिव्ह-इन मध्ये राहत होते

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्ह इन रिलशनशिपमध्ये राहत असलेल्या मैत्रिणीचा खून केल्याची घटना घडली आहे. प्रेताची विल्हेवाट लावत ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देणाऱ्या वेब पोर्टलच्या पत्रकाराचा भांडाफोड रविवारी झाला आहे. हा प्रकार 3 ऑगस्ट 2022 रोजी घडला असून याप्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रमा सिमंचाल मुनी (वय -28) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची ओरिसा राज्याची रहिवासी होती. रामदास पोपट तांबे (वय 30, रा. भोसरी,पुणे, मु रा. तांबेवाडी, ता. पाथर्डी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक लक्ष्मण डामसे (37)यांनी भोसरी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा एका वेब पोर्टलवर पत्रकारितेचा व्यवसाय आहे. त्याची मैत्रीण असलेल्या तरुणीने वडिलांच्या नावावर असलेल्या दोन घरांपैकी एक घर तिच्या नावावर करून द्यावे, तसेच पैसे आणि दागिनेही द्यावे अशी मागणी केली. त्यासाठी तिने आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यात वाद वाढले. आरोपीने साथ न दिल्यास लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवणार, अशी धमकी तिने दिली. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आरोपीने तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने भोसरी येथून केळगाव येथे नेले. तिथे नदी पात्रात तिची विल्हेवाट लावली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्याने सदर तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नुकतीच पोलिसांकडे दाखल केली होती त्यानंतर पोलिस तपासात तक्रारदारानेच खून केले असल्याचे उघडकीस आले आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव म्हणाले, आरोपी रामदास पोपट तांबे याने त्याची मैत्रीण चंद्रमा सिमांचल मुनी ही तीच्या वडीलांशी, त्यांच्यादोन घरांपैकी एक घर तीच्या नावावर करून देण्यासाठी वाद घालुन त्यांच्याकडुन रक्कम, दागिने तसेच घर नावावर करून घेण्यासाठी आरोपीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु आरोपीला ते पटत नसल्याने त्यांच्यातील वाद वाढू लागले. तसेच आरोपीने जर तीला साथ नाही दिली तरी ती आरोपीला रेपच्या गुन्ह्यात अडकवण्याची वारंवार धमकी देवु लागली. त्यामुळे आरोपीने तीच्या पासून कायमची सुटका करण्याचे मनात ठरवले. भोसरी येथील राहते घरुन तीला जीवे ठार मारण्यासाठी तीचे अपहरण करून तीची केळगाव ता. खेड, जि. पुणे येथे नदीपात्रात विल्हेवाट लावली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...