आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात तरुणावर प्राणघातक हल्ला:कोंढवा परिसरात भिकाऱ्यास मदतीला गेलेल्या तरुणावर चौघांकडून हल्ला

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील काेंढवा परिसरातील एनआयबीएम चाैकातील बेकर्स पाॅॅइंटच्या समाेर फुटपाथवर बसलेल्या एका भिकाऱ्यास मदत देण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणावर चाैघांकडून जीवेघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी साहिल अंजुम बागवान (वय-21,रा.काेंढवा) या तरुणाने अनाेळखी चार जणांविरोधात काेंढवा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली आहे.

तक्रारदार साहिल बागवान हा त्याचा मित्र अदनान पटेल याच्या साेबत 30 जुलै राेजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माेटारसायकलवरुन जात हाेते. बागवान याचा मित्र अदनान पटेल हा बेकर्स पाॅईटच्या समाेर फुटपाथवर एक भिकारी भीक मागत असल्याने त्या भिकाऱ्यास पैसे देण्यासाठी गेला हाेता. त्यावेळी एक अनाेळखी इसम त्याचे जवळ येवून काहीएक कारण नसताना त्याने त्याचे हातातील दगड घेवून तक्रारदार साहिल बागवान याचे कानावर, डाव्या डाेळयावर, डाेक्यात मारुन जखमी केले. तसेच तीन अनाेळखी इसम ही त्याच्या जवळ येवून त्यांनी काहीएक न विचारता थेट हाताने मारहाण केली. याबाबत काेंढवा पाेलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, पाेलिसांनी चार अनाेळखी इसमांचा शाेध सुरु केला आहे. याबाबत काेंढवा पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक एस. खेतमाळस पुढील तपास करत आहे.

पैसे न दिल्याने केली मारहाण

दुसऱ्या घटनेत हडपसर परिसरातील वैदुवाडी पेट्राेल पंप येथील रिक्षा स्टाॅप याठिकाणावरुन शुभम शंकर लाेंखडे (वय-26) हा तरुण 31 जलै राेजी कामाला जात हाेता. त्यावेळी त्याठिकाणी त्याचा ओळखीचा तरुण सुरत अरुण शिंदे (वय-33) हा आला. त्याने शुभम याच्याकडे दाेन हजार रुपयांची मागणी केली परंतु शुभम याने त्यास पैसे देण्यास नकार दिला असता, आराेपी सुरत शिंदे याने त्यास शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण करुन चेहऱ्यावर बुक्की मारुन त्याची दाढ अर्धवट ताेडून गंभीर जखमी केले आहे. याबाबत हडपसर पाेलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...