आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान महाराष्ट्राच्या युवा गाेलंदाज मनाेज इंगळे (५/४३), राजवर्धन हंगरगेकर (३/५८) आणि अक्षय पालकरने (२/६७) सर्वाेत्तम खेळीतून मंगळवारी आपल्या घरच्या मैदानावर दिल्लीचा धुव्वा उडवला. त्यामुळे यश धुलच्या नेतृत्वात दिल्ली संघाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सलामी सामन्यात आपला पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळावा लागला. संघाकडून हिमंत सिंगने सर्वाधिक ४९, कर्णधार यश धुलने ४० आणि सलामीवीर धुव्रने ४१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात यजमान महाराष्ट्र संघाची निराशाजनक सुरुवात केली. राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद ८० धावा काढल्या. अद्याप १११ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र संघाकडे ५ विकेट शिल्लक आहेत. सध्या टीमचा नाैशाद शेख (४४) मैदानावर कायम आहे. कर्णधार राहुल (१), सलामीवीर पवन (३) आणि काैशल तांबे (०) झटपट बाद झाले. त्यामुळे यजमान टीमला सावध खेळी करावी लागणार आहे. दिल्ली संघाकडून सिमरजितने २, ईशांत शर्मा आणि मयंक यादवने प्रत्येकी १ बळी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.