आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी समन्वय समितीची मागणी:लिपिक-टंकलेखक, कर सहायक पदांसाठी टायपिंग प्रमाणपत्र बंधनकारक करावे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी ) लिपिक-टंकलेखक आणि कर सहायक या पदांसाठी टायपिंग प्रमाणपत्र तसेच स्किल टेस्ट अनिवार्य केली आहे. मात्र, २०२१ च्या जाहिरातीनुसार मुख्य परीक्षेचा अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराने टायपिंग प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. परंतु, पूर्व परीक्षेसाठी टायपिंग प्रमाणपत्राविना ज्यांनी अर्ज केला आहे, अशा अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेपर्यंत ते प्रमाणपत्र मिळू शकत नाही. मात्र, अशा विद्यार्थांमुळे पूर्व परीक्षेचा कट ऑफ वाढतो व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असलेले हजारो विद्यार्थी नाहक स्पर्धेबाहेर फेकले जातात, असा दावा महाराष्ट्र एमपीएससी समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच हे प्रमाणपत्र बंधनकारक करावे, अशी मागणी समितीने एमपीएससी सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

विसंगती ठळक दिसली

समितीने सांगितले आहे की, टायपिंग नसल्यामुळे मुख्य परीक्षेत अनुपस्थित उमेदवारांची संख्या सातत्याने वाढते आहे. पूर्व परीक्षेचा कट ऑफ वाढत असून पात्र उमेदवारांच्या संधी हिरवल्या जात आहेत. तसेच कर सहायक परीक्षा २०१६, जाहिरात क्र. ३६/२०१६ अनुसार त्यावेळी आयोगाने अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत टायपिंग प्रमाणपत्राची अट घातली होती. परंतु २०२१ च्या जाहिरातीमध्ये ती अट मुख्य परीक्षेच्या दिनांकापर्यंत ठेवली. टायपिंगच्या अपात्र उमेदवारांना वगळण्याची कोणतीही व्यवस्था आयोगाने केली नाही. या दोन्ही जाहिरातींमधील विसंगती ठळकपणे दिसून येत असून उमेदवारांचे नाहक नुकसान टाळण्यासाठी आयोगाने नियमात बदल करण्याची मागणी समितीने केली आहे.

अर्जातच करावी मागणी

एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे म्हणाले की, आयोगाने येणाऱ्या २०२२ संयुक्त गट-क जाहिरातीत पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारतानाच फक्त टायपिंग प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनाच लिपिक व कर सहायक या पदांसाठी अर्ज करण्याचे संधी द्यावी. त्यांचे प्रमाणपत्र अपलोड करण्याची अथवा प्रमाणपत्र क्रमांक टाकण्याची तरतूद पूर्व परीक्षेच्या अर्जातच करावी अशी आमची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...