आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Mango Decoration For Rich Dagdusheth Bappa On The Occasion Of Akshayya Tritiya; The Offering Was Made On Behalf Of Desai Brother Ambewale, A Mango Trader From Pune

अक्षय्य तृतीया विशेष:अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला आंब्यांची आरास; पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दिला नैवेद्य

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक सण-समारंभाला पुणे येथील दगडूशेठ बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारच्या आरास तयार केल्या जातात. अक्षय्य तृतीय सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही हा आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.

ही आंब्याची आरास पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केली आहे. तसेच हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. असे देखील सांगण्यात आले.

अक्षय्य तृतीय सण आणि आंबा महोत्सवानिमित्त आज मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गणेश याग, दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनाना भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तर रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...