आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील मार्केटयार्डातील आंबा महोत्सवातून व्यावसायिकांचे १२ मोबाईल चोरुन नेल्याची घटना आठ ते नऊ एप्रिल दरम्यान घडली. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आंबा व्यवसायिक झोपल्याची संधी साधून मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी अक्षय थोटम (वय- २७ रा. हुशी, देवगड, सिंधुदुर्ग ) याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डमध्ये आंबा महोत्सवात अक्षयने आंबा विक्रीचा स्टॉल उभा केला आहे. ८ ते ९ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी अक्षयसह त्याचा साथीदार झोपी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्यासह इतरांच्या उशाजवळील १२ मोबाईल चोरुन नेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अक्षयला मोबाइल चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस पवार याबाबत पुढील तपास करीत आहेत.
दीड लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावली
वॉइन शॉपमधील जमा झालेली रोकड घेउन मालकाला देण्यासाठी गेलेल्या एकाच्या हातातील दीड लाखांची रोकड चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना आठ एप्रिलला रात्री पावणेअकराच्या सुमारास कल्याणीनगरममध्ये घडली.याप्रकरणी दिलीप राजोरे (वय ५९) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप हे वाइन शॉपमध्ये कामाला असून आठ एप्रिलला ते दीड लाखांची रोकड घेउन कल्याणीनगरला गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील दीड लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.