आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरहद' मदतीला:आपत्तीग्रस्त मणिपुरी बांधवांसाठी सरहद संस्थेची हेल्पलाईन; नातेवाईक, कुटुंबाशी संपर्क, निवास, भोजनाची व्यवस्था करणार

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत उसळलेल्या हिंसाचारामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण-रोजगारासाठी आलेल्या मणीपुरी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आणि अनिश्चितता पसरली असणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आपल्या मणिपुरी बांधवांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी 'सरहद' संस्था पुढाकार घेत आहे, अशी माहिती 'सरहद' संस्थेचे संजय नहार यांनी रविवारी पुणे येथे दिली.

मणिपूर मध्ये गेल्या काही दिवसांपासून समाजघटकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून उसळलेल्या हिंसाचारात सुमारे ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. जनजीवन विस्कळित झाल्याने व

तेथील भीतीपोटी होत असलेल्या स्थलांतरांमुळे व अस्थिर स्थितीमुळे जवळच्या नातेवाइकाशी संपर्क साधता येणेही कठीण झालेले आहे.

अशा स्थितीत महाराष्ट्रातील संकटग्रस्त मणीपुरी बांधवांना हरप्रकारे सहकार्य पुरवण्यासाठी सरहद संस्थेतर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार यांनी दिली आहे.

यापूर्वीही सरहद्द संस्थेने वेळोवेळी मणिपुरी विद्यार्थ्याना सर्वप्रकारे मदत केलेली आहे. सद्यस्थितीत सरहद्द संस्थेमध्ये संस्थेच्या​​​​​​​ शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या आधारे 25 पेक्षा अधिक मणिपुरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आपत्कालीन स्थितीत महाराष्ट्र आपल्या सीमावर्ती भागातील बांधवांमागे​​​​​​​ नेहमीच उभा राहिलेला आहे. सरहद या हेल्पलाईनवर संपर्क करणा-या मणीपुरी​​​​​​​ बांधवांना नातेवाइकांशी संपर्क साधणे अथवा माहिती मिळवणे, निवास-भोजन व्यवस्था करणे इत्यादी स्वरूपाची मदत पुरवणार आहे. तरी वाॅट्स्अ‌ॅप मेसेजेसव्दारे 9975656666 या क्रमांकावर आणि मेल व्दारे pune4manipur@gmail com या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सरहद संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.