आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला उद्योजकांना ताकद द्या:महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजकांना सीएसआरच्या माध्यमातून चांगली साथ मिळत असून उद्योजकांना ताकद दिली, तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे घोले रस्त्यावरील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 111 गरजू महिलांना आटा चक्की मशिन देण्यात आली. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. पुणेचे ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नवनीत मानधनी, सचिव सीए दुर्गेश चांडक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले उद्य सामंत?

उदय सामंत म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर करणारा हा उपक्रम आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करुन महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याची अंमलबजावणी देखील त्वरीत झाली. यामुळे महिला घराबाहेर पडून स्वत:च्या मेहनतीने पैसे मिळविण्यास उद्युक्त होतील. सामाजिक संस्थांनी देखील शासनाच्या अशा योजना व उपक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मदत महत्वाची

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, दुष्काळी, डोंगरद-या, दुर्गम भागात जाऊन निरंजन सेवाभावी संस्थांसारख्या संस्थांचे कार्य सुरु आहे. बीड, मराठवाडा सारख्या दुष्काळी भागात सुरु असलेले मदतीचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व कुटुंबांना उभे करण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.