आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजनेतून तरुणांना लष्करात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. लष्कराचे गणवेशाचे अनेकांना आकर्षण असते. या योजनेतून त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. लष्करातील जवानांचे सरासरी वय सध्या 32 आहे. अग्निपथ योजनेतील नवीन भरतीमुळे जवानांचे सरासरी वय 26 पर्यंत कमी होईल. यामुळे सैन्य आणि लष्कर शारीरिक आणि मानसिकरीत्या आणखी बळक होईल, असा विश्वास लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भारताची सीमा 2 प्रमुख देशांशी लागून आहे. सीमारेषेवर छुपे हल्ले होत असतात. त्यामुळे नवीन भरती होणाऱ्या तरुणांना लष्करात युद्धासाठी जे प्रशिक्षण दिले जाते, तेच प्रशिक्षण मिळणार आहे, असे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वलिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ब्रिगेडीअर पंकज पशपांद म्हणाले की, अग्निपथ योजनेत 4 वर्षे तरुणांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलात त्यांचा सामावेश होणार आहे. यासाठी तरुणांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. भरती होणाऱ्या तरुणांपैकी 25 टक्के लोकांना सेवेत कायम केले जाणार आहे. 4 वर्षाची नोकरी पूर्ण करून जे पुन्हा समाजात जातील ते उत्कृष्ठ प्रशिक्षित नागरिक म्हणून पाहिले जातील.
अग्निपथ योजनेत तरुणांना चांगल्या प्रकारे आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे. ही योजना सुरू करण्यापूर्वी जगभरातील विविध देशांचा लष्कर भरतीचा अभ्यास करण्यात आला आहे. या योजनेत देशभरातील तरुण सहभाग होऊ शकतात. त्याकरीता दहावी किंवा बारावी पास असणे बंधनकारक आहे. दुर्गम आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेवा करताना त्यांना संबंधित सबसिडी मिळणार आहे. सेवा समाप्ती वेळी त्यांना 11 लाख 70 हजार रुपये पॅकेज मिळणार आहे. या दरम्यान तो शहीद झाला तर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.