आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:केंद्र - राज्याच्या राजकारणात गेला मराठा आरक्षणाचा बळी, संभाजी ब्रिगेडचा पुण्यात आरोप

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादी मार्गावर जाण्याचा धोका - विकास पासलकर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणात व श्रेयवाद घेण्याच्या प्रयत्नात मराठा आरक्षणाचा बळी गेला आहे. राज्य सरकारने याप्रकरणी लवकर निर्णय घ्यावा आणि न्यायालयाच्या कसाेटीवर आरक्षण टिकेल असा प्रयत्न करावा. मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा अध्यादेश काढण्याची गरज असून मराठा तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न साेडवावा, अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादी मार्गावर जाण्याचा धाेका आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पासलकर म्हणाले, मराठा आंदाेलनात लाखाेंच्या संख्येने लाेक रस्त्यावर उतरले, ५० जणांनी बलिदान दिले. त्यानंतर सरकारने शिक्षण आणि नाेकरीत मराठा तरुणांना आरक्षण दिले. त्यापूर्वी गायकवाड आयाेगाने राज्यभर फिरून समाजाचे सर्वेक्षण केले. समाज मागासलेला असल्याचा अहवाल दिला. सर्वाेच्च न्यायालयात तामिळनाडूचे आरक्षण टिकते, त्यावर कुठे स्थगिती दिली जात नाही; परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. हा समाजावर केलेला अन्याय असून ताे कदापि सहन केला जाणार नाही. महाविकास आघाडी आणि भाजप सरकार यांच्यात सत्ता स्थापनेवेळी झालेला संघर्ष व त्यानंतर राज्याला केंद्राकडून दिली जात असलेली सापत्न वागणूक हे अशाेभनीय आहे. न्यायालयात बाजू मांडण्यास महाधिवक्ता, राज्य सरकार, वकील कमी पडले की प्रक्रिया हे तपासून पाहावे लागेल. आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजावर अन्याय झाला असून न्यायालयाविराेधात वक्तव्य करणे अवमान असते. मात्र, वेळप्रसंगी आम्ही न्यायालयाच्याही विराेधात जाऊ, असेही त्यांनी सांगितले.

समाजात उद्रेक होण्याची शक्यता

पासलकर म्हणाले, रस्त्यावरील-मैदानातील लढाईत आम्ही जिंकताे, परंतु तहात हरताे हेच सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. यापूर्वी तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आरक्षण किंवा नुकताच आर्थिक मागास आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे वर्ग करताना त्याला स्थगिती देण्यात आली नव्हती. मग मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत वेगळा निर्णय कशासाठी घेतला असावा, असा प्रश्न समाेर आला आहे. या दुर्दैवी निर्णयामुळे मराठा समाजाच्या मुलामुलींचे शैक्षणिक आणि नाेकऱ्यांत नुकसान हाेणार आहे. समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या असून समाजात उद्रेक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भावनांचा विचार व्हावा.