आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:20 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण प्रश्नी नांदेड येथे मूक मोर्चा तर 19 तारखेला औरंगाबादेत मराठा समन्वयकांची बैठक; संभाजीराजेंची घोषणा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची तयारी आहे',

मराठा आरक्षणप्रश्नी पुढील आठवड्यात शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूकमोर्चा आणि तत्पूर्वी १९ ऑगस्ट रोजी औरंगाबादेत समन्वयकांची बैठक होणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत २२ मागण्या मांडल्या होत्या. दोन महिन्यांनंतरही या मागण्यांची पूर्तता झालेली नाही किंवा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता आझाद मैदानावर समाजाने नव्हे तर आपली एकट्याने लाक्षणिक किंवा बेमुदत उपाेषणास बसण्याची तयारी असून समाजाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची पुण्यातील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सोमवारी विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजास यापूर्वी ‘पुढारलेला समाज’ सांगत त्यास आरक्षण दिले गेले नाही. वेगवेगळ्या सहा आयोगांनीही तसा अहवालही सरकारला दिला. परंतु आता परिस्थिती बदलेली असून ते अहवाल आता लागू हाेऊ शकत नाहीत. सर्वाेच्च न्यायालयात ज्याप्रकारे सरकारने भूमिका मांडणे अपेक्षित हाेते तशा प्रकारे ती मांडली गेली नाही. राज्य सरकारने आता राज्य मागासवर्गीय आयोग नेमून सर्वेक्षण करावे. मराठा समाज मागासलेला आहे हे राज्य सरकार सिद्ध करणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हरियाणामधील ‘रोडे मराठा’ जातीचा असून त्याचा महाराष्ट्रात सत्कार करण्यात येणार आहे. त्याला आमंत्रण देण्यासाठी संभाजीराजे हरियाणा दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचसोबत इतर पदक विजेत्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

तर समाजकार्य सोडून घरात बसेन : मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार काेल्हापुरात आमच्या वाड्यावर आले व त्यानंतर छत्रपती मॅनेज झाले, अशा खाेट्या बातम्या पसरवल्या गेल्या. परंतु आमच्या वाड्यात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत हाेत असते आणि चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे हाेत नाही. त्यामुळे छत्रपती मॅनेज झाले वगैरे असे काही हाेणार नाही. ज्या दिवशी मी मॅनेज झालो असे सिद्ध हाेईल त्या वेळी सामाजिक कार्य साेडून घरात बसेन, असे संभाजीराजे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...