आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Marathi News | School Start | Start Schools From 1st To 7th In Pune And Mumbai, Schools Will Start Mumbai 15 And Pune 16 Decemeber

शाळा सुरू:पुण्यात गुरुवारपासून तर मुंबईत उद्यापासून सुरू होणार पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा

पुणे/ मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हळूहळू राज्यातील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास मनपाने परवानगी दिली आहे. मुंबईत उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू करण्यास मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे.

तर पुण्यात देखील गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शाळेत किलबिलात पाहायला मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नव्हती. त्यात, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

औरंगाबादेत 20 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
शहरी तसेच ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात पहिली ते सातवीचे वर्गही 1 डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. आता 20 डिसेंबरपासून शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला 10 डिसेंबर आणि नंतर 15 डिसेंबर नंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...