आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसापला ‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022’:पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान व कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक रा. केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा ‘ मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२’ (संस्था) महाराष्ट्र साहित्य परिषदेला मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी एका विशेष समारंभात मुंबई येथे प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी स्वीकारला. रुपये २,००,०००/- सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित उपस्थित होते. या पुरस्कारासाठी कोणताही अर्ज न करता मसापने आजवर केलेल्या कामाची दखल घेतली.

बातम्या आणखी आहेत...