आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:काेराेनाविरुद्ध लढाईत मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्या ढाल-तलवारी आज नसल्या तरी काेराेना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे हे विसरू नका. वार करायचा तेव्हा वार करू, पण वार अडवण्यासाठी ढाल ही लगतेच. अनेक राजे हाेऊन गेले, परंतु छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात हाेती. काेराेनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळत आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर व्यक्त केली.

चैतन्यमय वातावरणात किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्माेत्सव साेहळा जल्लाेषात पार पडला त्या वेळी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शासनाने किल्ले संवर्धन व जतनाबाबत माेहीम हाती घ्यावी तसेच समुद्रातील किल्ल्यांबाबत वाहतूक व्यवस्था करून पर्यटनाला गती द्यावी, अशी अपेक्षा या वेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

दादांची भाषा शिकणार!
छत्रपती शिवरायांना येणाऱ्या विविध भाषांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री ठाकरे मिश्किलपणे म्हणाले, शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत हाेत्या. त्यातील एक भाषा अजितदादांना येते. ती मला शिकायची आहे. दादांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे कळले पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...