आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार प्रकरण:पुण्यात मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार; चार नराधमांना अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात २५ वर्षीय मतिमंद मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दुर्वेश जाधव (३६), श्रीकांत सरोदे (३६), आदित्य पवार (१९) आणि आशिष मोहिते (१८) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

पीडित मुलगी मतिमंद असून शुक्रवारी मुलगी सायंकाळी भारती विद्यापीठ परिसरातील घरी निघाली असता आदित्य पवार याने तिला स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. त्या ठिकाणी इतर साथीदारांना बोलावून घेत त्यांनी एका बंद खोलीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

मुलीच्या रडण्याचा आवाज खोलीतून बाहेर आल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला व त्यांनी घरास बाहेरून कडी लावत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी चार आरोपींना अटक करत तरुणीची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी श्रीकांत सरोदे हा वर्ष २००९ मधील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.

पिंपरीत मुलीवर ३ अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
पिंपरी- चिंचवड येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...