आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्री स्टाइल हाणामारी:पुण्यात प्रोटेस्टदरम्यान नर्स आणि महिला बाउंसरमध्ये हाणामारी, पोलिस स्टेशनमध्ये केली तडजोड

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवाजी नगर कोविड सेंटरवर तैनात आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासाठी आंदोलन सुरू आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर कोविड जंबो हॉस्पिटलमध्ये नर्स आणि तिथे ड्यूटीवर तैनात महिला बाउंसरमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. ज्यानंतर काही वेळाने रुग्णालयात गोंधळ उडाला. तिथे उपस्थित लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचे नियम तोडत दोघांना सोडवले. मात्र हाणामारी नंतर दोन्ही पक्षांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तडजोड केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला. यामध्ये हा गोंधळ कैद झाला आहे.

गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. शिवाजी नगर कोविड सेंटरवर तैनात आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासाठी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनादरम्यान एक महिला नर्स आणि वार्डबॉयमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहत ड्यूटीवर तैनात एक महिला बाउंसर दोघांच्या मध्ये गेली आणि नर्ससोबत धक्काबुक्की करु लागली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला.

प्रकरणाचा तपास सुरू
आंदोलन करत असलेल्या नर्सने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जवळपास दोन तास सेंटरच्या बाहेर बसून आंदोलन केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ पुणे महापौरांकडे आल्यानंतर त्यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...