आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Massive Fire In Pune: Big Basket Warehouse Burnt Down, Fear Of Loss Of Crores; Took 5 Hours To Control The Fire; News And Live Updates

पुण्यात भीषण आग:'बिग बास्केट'चा गोदाम जळून खाक, कोट्यवधींच्या नुकसानीची भीती; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागले 5 तास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे.

पुण्याच्या बावधन बुद्रुक येथील ऑनलाईन किराणा माल विकणाऱ्या 'बिग बास्केट'च्या गोदामाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. दरम्यान, या आगीत गोदामाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री लागलेल्या आगीमुळे गोदामामध्ये फारसे लोक नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत कोट्यवधी रुपयांचे धान्य, भाज्या आणि किराणा माल जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु शॉर्ट सर्किट हे एक कारण असू शकते असे सांगितले जात आहे.

आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे.
आगीत गोदामातील लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे.

5 तासांनंतर आग आटोक्यात
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या एकूण 12 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे 5 तास लागले. सोमवारी सकाळी 6 वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले. ही आग रात्री लागल्यामुळे परिसरात फारसे लोक नव्हते. त्यामुळे गर्दीचा परिसर असूनही अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहचण्यास कोणतीही अडचण आली नाही.

बातम्या आणखी आहेत...