आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:मविआ एकजुटीने लाेकसभेत 40, विधानसभेत 200 जागा जिंकेल ;खासदार संजय राऊत यांनी भाजपवर डागली तोफ

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीने भाजपला धडा शिकवलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहिलाे, तर भाजपच्या विराेधात आगामी काळातही विजय शक्य आहे. परंतु थाेडे इकडे-तिकडे गेलाे, तर चिंचवडप्रमाणे निकाल लागू शकताे. कसब्याचा निकाल राज्याच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. महाविकास आघाडीने एकजूट दाखवली, तर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत राज्यात २०० पेक्षा अधिक जागा जिंकता येतील आणि लाेकसभेत ४० जागा जिंकू शकतो, असे मत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

राऊत म्हणाले, चिंचवडमध्ये आमच्याकडून चुका झालेल्या आहेत, त्या ठिकाणचा विजय हा भाजपचा विजय नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षे जगताप पॅटर्न चालताे, त्यामुळे हा त्यांचा विजय आहे. उमेदवार निवडताना अधिक काळजी आम्ही घेतली असती आणि बंडखाेर उमेदवार राहुल कलाटे यांना माघार घेण्यास लावू शकलाे असताे. तेव्हा निवडणूक निकाल निश्चित वेगळा लागला असता. सत्तेचे दर्शन, प्रदर्शन, विकृती हाेऊनही कसब्यातील सुजाण मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिली. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु पुणेकर आमिषाला बळी पडले नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले, परंतु जनतेने त्यांना नाकारले. हेच चित्र आगामी काळात राज्यात दिसेल. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय स्थानिक पातळीवर घेतला जाताे. या ठिकाणी निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत एकत्रित चर्चा करता येईल.

विधिमंडळाचा मला आदरच, योग्य उत्तर देणार हक्कभंगप्रकरणी अटकेचे प्रयत्न सुरू याबाबत राऊत म्हणाले, कायदा, न्यायालय, पाेलिस अजून पूर्णपणे खाेक्याखाली चिरडलेले नाही. अद्याप काही रामशास्त्री जिवंत आहेत. ४० आमदारांनी स्वत:चे अंतरंग तपासावे. त्यांनी केलेल्या चुकांमुळे ते आत गेले पाहिजेत. न्यायालयात याबाबत खटला सुरू आहे. मी विधिमंडळाचा आदर करताे, माझे विधान हे एका फुटीर, चाेर गटापुरते मर्यादित हाेते. कायदा, संविधान, नियम मला माहिती आहेत. मला ज्या नाेटिसा पाठवल्या त्या पाहून मी त्यास याेग्य उत्तर देईन.

बातम्या आणखी आहेत...