आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीएच्या पदाधिकार्‍यांचा निर्णय:मुंबई असोसिएशन धर्तीवर एमसीएसुध्दा 100 संघ तयार करण्याचा प्रयत्न

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरामध्ये इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळालेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एमपीएल लीग सुरु करणार आहे.एमसीएच्या अंतर्गत सध्या 24 संघ खेळत आहेत. यावर्षी या सर्वाचा अभ्यास असून 48 संघ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे तर पुढील वर्षी 72 संघ तयार करण्यात येणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने ज्या प्रमाणे 100 संघ तयार करुन स्पर्धेत उतरवले आहेत त्याच धर्तीवर एमसीएसुध्दा 100 संघ तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला एमसीएचे सचिव सुभेंद्र भंडारकर, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, पीडीसीएचे सचिव सुशील शेवाळे, राजु काणे, सुनील मुठा यांसह पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, क्रिकेटला वाढता प्रतिसाद आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एमपीएल सुरु करण्याचा एकमुखी निर्णय अ‍ॅपेक्स समितीने घेतला आहे. यावर्षी पहिल्यांदा ही लीग होणार असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 4 महिला संघांना संधी दिली जाणार आहे. खेळाडूंच्या लिलावापासून सर्व आयपीएलच्या धर्तीवरच घेण्यात येईल. पहिलेच वर्ष असल्याने ती पुण्यात होईल परंतु, पुढील वर्षापासून प्रत्येक विभागवार घेण्याचा मानस आहे.

खेळाडूंची वय चोरी, पारदर्शक निवड, संघाची शिस्तबध्दता आदि सर्वांचा विचार करुन खेळाडूंची निवड केली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये ही अशाच प्रकारे पारदर्शक पणे खेळाडूंची निवड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वय चोरीमध्ये एखादा खेळाडू आढळल्यास तीन वर्षाची बंदी करण्याचा कडक नियम लागू करण्यात आला असून क्लब पातळीवर ही अशा प्रकारे तीन वेळा गोष्टी आढळून आल्यास क्लबवर काय कारवाई करायची याबाबत सध्या विचारविनिमय सुरु असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...