आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बुटीक चालक महिलेला मारहाण:​​​​​​​कामाचे उर्वरीत पैसे मागितल्याने शिवीगाळ, ठार मारण्याचीही धमकी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमजी रोडवरील रहेजा मिडास कॉम्प्लेक्स, दुकान क्रमांक 9 मध्ये बुटीक चालवणाऱ्या आफरीन अली अहमद खान (34) या महिलेला दिवा पेजेंट्सच्या एमडी अंजना मस्करेन्हास यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप असून या प्रकरणी आफरीनने लष्कर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गालावर, नाकावर वार

प्राप्त माहितीनुसार, आफरीनने अंजनाकडे कामाचे उरलेले पैसे मागितले होते. अंजना मस्करीनेस हिने तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अंजनाने तिच्या डाव्या गालावर व नाकावर हाताने वार करून तिला जखमी केले, तसेच दुकान बंद करून काम करू न देण्याची धमकी दिली.

पत्रकार परिषेदत मांडली आपबिती

या घटनेची माहिती देण्यासाठी आज (2 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आफरीनने सांगितले की, अंजना ही तिची नियमित ग्राहक होती आणि तिला एक वर्षापूर्वी अंजनाबद्दल व्यावसायिक क्षेत्रातील संबंधातून माहिती मिळाली. अंजनाचा फॅशन शो आणि इव्हेंटचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाच्या अनुषंगाने तिने आफरीनसोबत 57 गाऊनची ऑर्डर दिली होती, ज्याची किंमत 57,000 रुपये होती.

परत काॅल करू नकोस

अंजनाने फक्त 5000 रुपये अनामत म्हणून दिले. बाकीचे पैसे मागण्यासाठी आफरीनने तिच्या असिस्टंटला फोन केला होता. त्यावेळी सहायकाने तिला परत फोन करू नकोस असे सांगितले आणि म्हणाली, "अंजना मॅडम तुमच्या दुकानात येऊन स्वतः पैसे देतील."

दुकानात घुसून मारहाण

आफरीन म्हणाली, “यानंतर अंजना अचानक दुकानात घुसली आणि मला माझे पैसे मागायचे नाहीत असे ओरडले. तिने सांगितले की मी सर्व गाऊन खराब केले. असे म्हणत तिने मला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे सर्व माझ्या दुकानात आणि दुकानाबाहेरील सार्वजनिक पॅसेजमध्ये घडले. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार बघत होते, त्यांनीही तिला विरोध केला, मात्र ती मला शिवीगाळ करत राहिली. त्यानंतर मी 112 वर फोन केला असता अंजना तिथून पळून गेली. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात जाऊन तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...