आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:'सेव्ह द चिल्ड्रन'तर्फे शासकीय व स्वयंसेवी संस्थेची पुण्यामध्ये बैठक; वंचित बालकांच्या हक्कांसाठी शासकीय यंत्रणांचा समन्वय असण्याची गरज

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात कुटुंबापर्यंत सहीसलामत पोहचवण्यासाठी 'द इन्व्हिजीबल' प्रकल्प कार्यान्वित आहे.

गरजू बालकांना त्यांचे हक्क व अधिकार मिळून द्यायचे असतील तर शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अमिताव बारीक यांनी केले. रस्त्यावर राहणाऱ्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना आधार देण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेमार्फत शासकीय यंत्रणेची व स्वयंसेवी संस्थांची बैठक पुण्यात पार पाडली यावेळी ते बोलत होते. रस्त्यावरील बालकांना कायदेशीर ओळख मिळणे आणि संबंधित बालक हरवल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबापर्यंत सहीसलामत पोहचवण्यासाठी 'द इन्व्हिजीबल' प्रकल्प कार्यान्वित आहे.

पुण्यामध्ये आतापर्यंत एकूण 453 बालकांना आधार कार्ड मिळवुन देण्यात आले आहेत. संस्थेला कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणींविषयी कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प व्यवस्थपक मनीषा बिरारिस सांगितले की, रस्त्यावरील मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती नेमणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीच्या माध्यमातून रस्त्यावरील मुलांच्या समस्यांचे निराकरण करावे असे प्रतिपादनही बिरारिस यांनी यावेळी केले.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी मुलांच्या निवासी व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांबाबत कृती आराखडा बनवून त्यावर कार्य करू असे त्यांनी आश्वासन दिले. पोस्टल खात्याचे अधिकारी मुकुंद बडवे यांनी 'रस्त्यावरील मुलांना कायदेशीर ओळख व सामाजिक सुरक्षा योजना मिळवून देण्यासाठी आमचे सहकार्य राहील' असे सांगितले.

बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष विजया वांजपे व सदस्या बिना हीरेकर, अर्जुन दांगट, लक्ष्मण धनावडे, जयश्री मोघे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद, एकात्मिक बाल विकास प्रकल्प उपयुक्त दिलीप हिवराळे, डाक खात्याचे योगेश वाळुंजकर, नजरीन पठाण, दत्तात्रय कोंढाळकर, कौशल विकास अंतर्गत मुक्ता खसनीस आदी बैठकीस उपस्थित होते. सामजिक कार्यकर्ते अमोल धावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सामजिक कार्यकर्ते नीलेश सातपुते, विनोद गोरे, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...