आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुला स्वयंपाक करता येत नाही, तु आमची मोलकरीन आहेस, माहेरहून दोन लाख रुपये हुंडा घेऊन ये, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 एप्रिल 2016 ते 4 ऑगस्ट 2022 या कालावधीत चिखलीतील मोरेवस्ती येथे हा प्रकार घडला आहे.
गुन्हा दाखल
चिखली पोलिस ठाण्यात या प्रकरणी 33 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. अभय प्रकाश कांबळे, प्रकाश बाबुराव कांबळे, शरद येलदरे आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसिक व शारीरिक दिला त्रास
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, फिर्यादी यांचे पती डॉ. अभय कांबळे यांनी फिर्यादी यांच्यासोबत वेळोवेळी अनैसर्गिक संबंध ठेऊन पीडितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांची सासू यांनी फिर्यादी यांना लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने स्वतः कडे ठेऊन घेतले. तसेच सासरच्या सर्व लोकांनी फिर्यादी यांना तुला स्वयंपाक येत नाही, तुला आमची मोलकरीन आहे, माहेरहून दोन लाख रुपये हुंडा घेऊन ये असे म्हणत मानसिक त्रास दिला. तसेच आमच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या कुटूंबाला संपवून टाकू, अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे फिर्यादी सासरी राहत असताना फिर्यादी यांचे सासरे रात्री अपरात्री त्यांच्या बेडरूममध्ये येऊन माझा मुलगा नसला तरी मी आहे ना तुला, असे म्हणत फिर्यादी यांच्यासोबत अश्लिल वर्तन करत असे. चिखली पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.