आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासासूचे कोणत्या तरी परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे सुनेला समजल्याने पती, सासूने तसेच दिराने मिळून महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने पती ,सासू आणि दिरा विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,सदरचा प्रकार 19 /2 /2022 ते आतापर्यंत घडलेला आहे. संबंधित महिला ही धायरी परिसरात राहण्यास असून सूनेला तिच्या सासूचे कोणत्यातरी परपुरुषाशी अनैतिक संबंध होते. हे महिलेस समजले. नंतर तिने याबाबत पतीला सांगितले मात्र, पतीने त्याच्या आईच्या अनैतिक संबंधबाबत कोणाला सांगितले तर मी तुला जाळून मारून टाकीन अशी धमकी पत्नीला दिली.
तसेच पती दीर आणि सासू यांनी संगनमत करून तिला शिवीगाळ व मारहाण करून, तिचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे. याप्रकरणी सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस खडके याबाबत पुढील तपास करत आहेत.
सासर्याकडून सुनेचा विनयभंग
पुण्यातील आंबेगाव परिसरात राहत असलेल्या एका 30 वर्षीय महिलेच्या सासऱ्याने महिलेसोबत फोनवर अश्लील बोलणे करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सासरे विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सासऱ्याने सुनेला मोबाईलवर फोन करून वाईट वाईट शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे सुनेने मला तुम्हाला भेटायचे आहे, मी कात्रज चौकात आहे असे सांगितलं. त्यावर तक्रारदार महिलेस सासऱ्याने अश्लील बोलणे करून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केले आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवलदार एस गोसावी पुढील तपास करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.