आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमली पदार्थ मेफेड्रॉन (एमडी)विक्री करण्यासाठी आलेल्या दोनजणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाख ५० हजारांचा एमडी पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय रोकड आणि इतर ऐवजही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला. सदरची कारवाई बंडगार्डन आणि खडकी ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
संगम पुलाजवळ आरटीओ कार्यालयाजवळ एक व्यक्ती एमडी अमली पदार्थ विकण्यासाठी येणार आसल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मोहिते व विशाल शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने समीउल्ला सलीम शेख (वय -२७, रा. बोपोडी,पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पावणेतीन लाखांचे मेफेड्रॉन आणि मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे खडकीतील बोपोडीत मिलींदनगर येथे जितु सुंदर नायडु हा व्यक्ती एमडी विक्रीच्या तयारीत असताना त्याला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रॉनसह सहा लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
संबधित दोन्ही गुन्ह्यातील आरोपा एकमेकाचे संपर्कात असुन ते मुंबईतून मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आणुन त्याची पुण्यात विविध भागात विक्री करीत होते. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, नितेश जाधव, रेहाना शेख यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.