आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:पुण्यातील सहकारनगर परिसरात मेफेड्राॅन (एमडी)तस्करी; आराेपीस अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील सहकारनगर परिसरात मेफेड्राॅन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आराेपीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविराेधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक लाख चार हजार रुपये किमतीचा मेफेड्राॅन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे. राेहन काळुराम खुडे (२६, रा. पर्वती दर्शन, पुणे) असे आराेपीचे नाव आहे. अमली पदार्थविराेधी पथक एकचे पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पाेलिस निरीक्षक शैलजा जानकर यांचे पथक सहकारनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्राेलिंग करत हाेते. या पथकाला धनकवडी परिसरात एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी सापळा रचून राेहन खुडे यास अटक केली.

बातम्या आणखी आहेत...