आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थ जप्त:नायजेरियन जोडप्याकडून 1  कोटींचे मेफेड्रोन जप्त

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ड्रग्ज तस्करांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि अमली पदार्थ जप्त केले गेले आहेत. मंगळवारी एका नायजेरियन जोडप्याकडून तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांचे कोकेन, मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत.

उगूचुकू इमॅनुअल (४३, रा. नालंदा गार्डन रेसिडेन्सी, पुणे, मूळ नायजेरिया), एनिबेल ओमामा व्हिव्हान (३०, नालंदा गार्डन रेसिडेन्सी, मूळ नायजेरिया) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनुसार, अमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखेच्या एका पोलिस अंमलदाराला एका खबऱ्यामार्फत नालंदा गार्डन रेसिडन्सी येथे अमली पदार्थ विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला. तसेच बनावट ग्राहक पाठवून या जोडप्याकडे अमली पदार्थांची मागणी केली. या वेळी दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९६ लाख ६० हजार रुपयांचे ६४४ ग्रॅम मेफेड्रॉन तर २०१ ग्रॅम आणि १२० मिलिग्रॅम कोकेन आणि किरू असे ३० लाख १६ हजार ८०० रुपये तर रोख २ लाख १६ हजार ६००, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पिशव्या आणि डब्या असा एकूण १ कोटी ३१ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...