आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:परीक्षेचा पेपर व्हायरल करण्यासाठी आरोपींकडून ‘टेलिग्रॅम ॲप’चा वापर, संभाषणासाठी कोडवर्डची भाषा

पुणे / मंगेश फल्लेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडगिरेने भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी संचालकांना दिला पेपर

आराेग्य भरती परीक्षेचा गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचा पेपर सेट करणाऱ्या समितीतील सहसंचालक महेश बाेटले याने आपल्या शिपायाच्या माध्यमातून पेनड्राइव्हद्वारे लातूरचा सार्वजनिक आराेग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्या वाहनचालकास दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पेपर फोडल्यानंतर तो बडगिरे याने वेगवेगळया भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकांना पुरवला. यादरम्यान आराेपींनी एकमेकांत पेपर व्हायरल करण्यासाठी टेलिग्रॅम ॲपचा वापर केल्याची बाबही पाेलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथील मेंटल हाॅस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप जाेगदंड आणि अंबाजाेगाईतील गट चारचा अधिकारी श्याम म्हस्के यांना प्रशांत बडगिरे याने पेपर दिला हाेता. जाेगदंड याच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र सानप याला पेपर दिला गेला. सानपने बीडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उद्धव नागरगाेजे यास पेपर पाठवला. नागरगाेजे याने त्याचा मुंबईतील नेव्हल डाॅकयार्ड येथील खलाशी प्रकाश मिसाळ याला गट ‘ड’ परीक्षेचा पेपर पाठवून वेगवेगळ्या चार एजंटना भेटावयास लावून त्यांच्याशी पेपरबाबत बाेलणी करून पैसे देणारे विद्यार्थी हेरण्यास सांगितले. मिसाळ यानेच आैरंगाबाद येथील सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या आणि ट्रेनिंग अकॅडमी चालवणाऱ्या संदीप भुतेकर आणि फरार दाेन एजंटला पेपर पुरवल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. भुतेकर याने फरार रजपूत याला पेपर दिला. भुतेकरचे घर व आॅफिसच्या झडतीत २१ परीक्षार्थींची मूळ शैक्षणिक कागदपत्रेही सापडली आहेत.

बबन मुंढेने हेरले क्लासचालक
रजपूतने बुलडाण्यातील पळसखेड झाल्टा येथील शेतकरी बबन मुंढे याला पेपर पाेहोचवला. त्याने अंबडच्या विजय मुऱ्हाडे व अनिल गायकवाड यांना पेपर टेलिग्रॅम ॲपवर दिला. मुऱ्हाडेच्या माध्यमातून पुढे अनेक परीक्षार्थी संपर्कात आले. गायकवाड याचा एमएससीआयटीचा क्लास असून त्याने ३१ आॅक्टाेबर राेजी सकाळी मुऱ्हाडेच्या मदतीने जालना जिल्ह्यातील घनसावंगी परिसरातील ट्रेनिंग अकॅडमी चालक सुरेश जगताप यास टेलिग्रॅम अॅपच्या माध्यमातून पेपर पुरवला. पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आराेग्य भरती परीक्षेत सर्वप्रथम आैरंगाबाद येथून विजय मुऱ्हाडे या आराेपीस अटक करण्यात आली हाेती. आैरंगाबाद येथील क्लासचालक अजय चव्हाण, कृष्णा जाधव आणि अंकित चनखाेरे या तिघांनी १०० परीक्षार्थींना आराेग्य भरती परीक्षेचा गट ‘क’ व ‘ड’चा पेपर पुरवण्याचे आश्वासित केले होते, असेही तपासात निष्पन्न झाले.

संभाषणासाठी आराेपींची काेडवर्डची भाषा
पुणे पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, पेपर भरती घाेटाळ्यातील आराेपींच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेण्यात येत आहे. आराेपी एकमेकांशी काेडवर्डमध्ये बाेलत होते. माेबाइलवरही काेडवर्डमध्ये बाेलत होते, याचेही पुरावे आहेत. पेनड्राइव्ह, लॅपटाॅप, माेबाइल, हार्डडिस्कमधील माहितीचे विश्लेषण सुरू आहे. प्रत्येक परीक्षेचा दर वेगवेगळा ठरवण्यात आला हाेता. आराेपींना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या फाेनवर विद्यार्थ्यांचे सातत्याने फाेन येत हाेते. आराेग्य भरती व म्हाडा परीक्षेतील आराेपींत साम्य आहे.

म्हाडा पेपरफुटीतील दोघांचा रिव्हिजन अर्ज फेटाळला
महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील दोन आरोपींनी पोलिस कोठडी रद्द करण्यासाठी केलेला रिव्हिजन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला. अंकुश हरकळ आणि संतोष लक्ष्मण हरकळ, (रा. औरंगाबाद) यांच्यासह डॉ. प्रीतीश देशमुख याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...