आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षात पुणेकरांचे स्वप्न होणार साकार:म्हाडाकडून नव्या वर्षात तब्बल 5 हजार 5195 घरांची सोडत, घरबसल्या भरता येणार अर्ज

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात स्वस्तात घर घेण्याचे पुणेकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुण्यात म्हाडा कडून नव्या वर्षात 4 जानेवारी रोजी तब्बल 5 हजार 5915 घरांची सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत नव्या संगणक प्रणालीनुसार काढण्यात येणार आहे. या सोडतीमुळे पुण्यात घर घेण्याचे अनेक सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे अशी माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी बुधवारी दिली आहे.

ही सोडत आयएलएमएस 2.0 या संगणक प्रणालीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा होती आणि त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर होत असे. तसेच कागदपत्रांची पूर्तता, छाननी आदी प्रक्रिया पार पाडली जात होती. आता नवीन आयएलएमएस 2.0 प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया अर्ज भरण्यावेळीच घरबसल्या पूर्ण करावी लागणार आहे.

पुणे म्हाडा विभागांतर्गत प्रथमच केवळ पुणे जिल्ह्यांतर्गत सोडतीमध्ये साडेचार हजारांहून अधिक सदनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील 2594, सर्वसमावेशक योजनेंतर्गत (20 टक्के) 2990 आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 अशा एकूण 5 हजार 5915 सदनिकांचा समावेश आहे, अशी माहिती माने-पाटील यांनी दिली.

म्हाडाने या वर्षी दोन सोडती काढल्या होत्या. यामुळे अनेकांची पुण्यात घर घेण्याचे स्वप्न ही पूर्ण झाले आहे. या सोडतीमुळे देखील स्वस्तात नागरिकांना घर घेता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीत सहभाग घ्यावा आणि आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन देखील नितीन माने पाटील यांनी केले आहे.

अशी आहे नवी संगणक प्रणाली

  • म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रीया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधीक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षीत झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रीया आता ऑनलाईन करण्यात आली आहे.
  • म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता ILMS 2.0 (Integrated Lottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रीया हाताळली जाणार आहे, यामध्ये नागरिकांकडून डीजीटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे जतन करून ठेवली जातील.
  • अर्जदारास नोंदणी करताना एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे. त्यामुळे अर्जदार आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये झालेल्या बदलांची नोंद अर्जात कधीही करू शकतात. अशाप्रकारे नोंदणीकरण प्रक्रियेत सर्व कागद पत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्जदार हे म्हाडाचे सदनिका विक्रीच्या सोडतीतील पात्र उमेदवार ठरतील व अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होणार आहे.
  • सोडतीत सदनिका प्राप्त झालेल्या यशस्वी अर्जदारांची माहिती देखील या प्राणालीत जतन केली जाणार आहे. अशा अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा अर्ज प्रणालीतून रद्द होऊन त्यांना तात्काळ याबाबतची माहिती तुमच्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...