आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:स्थलांतरित मजुरांविषयी संवेदनाहीन-मुर्दाड केंद्र सरकारला अजूनही जाग कशी येत नाही - काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी 

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थलांतरित मजुरांना न स्वीकारणाऱ्या राज्यांवर केंद्राने त्वरित कारवाई करावी - काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

गेले अनेक दिवस स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. हजारोच्या संख्येने आजही हे मजूर अनेक ठिकाणी अडकले आहेत. पायी घरी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांवर आपत्ती येत आहे. कालच औरंगाबाद जालना रस्त्यावर सोळा स्थलांतरित मजुरांना रेल्वेने चिरडल्याची भीषण घटना घडली. शेकडो किलोमीटरची पायपीट हे लोक आपल्या कुटुंबकबिल्यासहीत करीत आहेत. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने ढिम्मपणा सोडून त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

यासंदर्भात काढलेल्या पत्रकात गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या 'महाविकास आघाडी' सरकारने या मजुरांना परत पाठवण्यासाठी सर्व तयारी केली असताना गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार सारखी राज्ये मजुरांना परत घेण्यास तयार नाहीत. अशक्यप्राय अटी घालून या मजुरांचे स्थलांतर या राज्यांनी रोखून धरले आहे...(?) हे अत्यंत भीषण आहे. या मजुरांना आहे अशा अवस्थेत या राज्यांनी घेऊन जावे. त्यासाठी केंद्र सरकारने आता क्षणाचाही विलंब न करता हस्तक्षेप करावा आणि मजुरांना परत न घेणाऱ्या राज्यांवर कारवाई करावी. 

'विविध प्रांतीय मजुरांच्या हलाखीच्या स्थितीच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. कोणत्याही संवेदनशील माणसाला धक्का बसावा अशीच ही स्थिती असताना, केंद्र सरकार अजून इतके संवेदनाहीन व मुर्दाड कसे..? असा सवालाही उपस्थित केला असून, 'केंद्र सरकार'च्या गरीब-मजुराविषयीच्या बघ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बेरोजगारीची समस्या संपवण्यासाठी मोदी सरकारने कोरोना ऐवजी भूकबळीनेच गरीब-कामगार-रोजंदार मारणार नाहीत याची कृतिशीलपणे व तीव्रगतीने काळजी घ्यावी अन्यथा येणार काळ भाजप सरकारला कधीही माफ करणार नाही असा इशाराही दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...