आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजूरांची वापसी:पुण्यात परतत आहेत परप्रांतीय मजूर, आमदार रोहित पवारांनी केले मराठी तरुणांना 'हे' आवाहन

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.

कोरोना संकटात लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले होते. आता लॉकडाउनच्या अटी या शिथिल करण्यात आल्या आहेत. याच कारणामुळे मजूर पुन्हा एकदा शहरांकडे वळाले आहेत. पुण्यातही मोठ्या प्रमाणा परप्रांतीय परतत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मराठी तरुणांना अवाहन केलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मराठी तरुणांना आवाहान केलं आहे. 'पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात' अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउन 5 च्या टप्प्यात अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यानंतर परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबई, पुण्याकडे वळाले आहेत. याच मुद्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट करून मराठी तरुणांना आवाहान केलंय. 

रोहित पवार म्हणाले की, 'पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं.

बातम्या आणखी आहेत...