आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:सौम्य कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण घरामध्येच क्वॉरंटाइन - विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'नागरिकांनी स्वयंम शिस्त पाळावी अन्यथा कारवाई करावी लागेल'

सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांना घरामध्येच क्वॉरंटाइन राहण्यास अखेर पुणे जिल्ह्यात परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये असलेले लक्षणे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॅ दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काही दिवसांपूर्वीच डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरने कोरोना रुग्णांसंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यामध्ये सौम्य व लक्षणे नसलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांकडून संसर्ग होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. या पार्श्वभूमीवर अशा सौम्य व लक्षणे असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये “होम क्वारंटाईन” परवानगी देऊ शकतो. परंतु पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रामुख्याने शहरातील झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या भागात रुग्ण अधिक आहेत. यामुळे सौम्य व लक्षणे नसलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईनला परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु आता शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्येदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. शहरामध्ये दररोज मोठ्या संख्येने पाॅझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी स्वयंम शिस्त पाळावी अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त डाॅ.के.वेकटेशम यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...