आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:'मिमिक्री' करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची बारामतीत टीका

प्रतिनिधी | पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वतः:चा पक्ष काढला, पण पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना माझी मिमिक्री करण्यात आणि व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटत असेल तर, मी त्यासाठी शुभेच्छा देतो. मिमिक्रीखेरीज राज यांना येतेच काय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांची रविवारी बारामीत खिल्ली उडविली.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित व्यंगचित्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले होते आणि ‘आता यांना गप्प बसा, असे लिहू का, ‘अशी उपरोधिक टीका केली होती. तसेच रत्नागिरी येथे बोलताना राज यांनी पुन्हा अजित पवार यांची मिमिक्री केली होती. ‘मिमिक्री करणे हा राज यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना मिमिक्री शिवाय येतंच काय? शिवसेना सोडून ते बाहेर पडले तेव्हा १४ आमदार होते. जनतेने त्यांना नाकारले आहे, असेही पवार यांनी य वेळी सांगितले.

नेमक काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

अजित पवारांची राज्यात चर्चाच चर्चा असताना मनसे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. यापुढेही त्यांनी 'गप्प बसा' असा सल्ला अजित पवारांना दिला. या व्यंगचित्राची चर्चाच चर्चा होत आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षृ समितीची बैठक झाली. यात शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावण्यात आला. या निर्णयानंतर अजित पवारांची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे, असे असतानाच आता व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी लगावलेल्या फटकाऱ्याने अजित पवारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचा राजीनामा मंजूर न झाल्याने अजित पवारांची कोंडी झाल्याचीही चर्चा आहे.

जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींच कौतुक देखील यावेळी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह धरला होता.

तीनच मिनिटांत काढले व्यंगचित्र

राज ठाकरे यांनी यावेळी केवळ तीन मिनिटात अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले होते आणि ते पूर्ण होताच, आता पुढे काय लिहू ‘आता गप्प बसा’ अस राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हषा पिकला. यावर आता अजित पवारांचीही तितकीच प्रभावशाली प्रतिक्रीया असेल हे सांगायला नको.