आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Union Home Minister Awarded National Trophy To Maharashtra Police Wireless Training Center Best Award Of 20 Lakhs At National Level

राष्ट्रीय स्तरावरील सन्मान:केंद्रीय गृहमंत्री राष्ट्रीय करंडक महाराष्ट्र पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्रास प्रदान; 20 लाखांचा सर्वात्कृष्ट पुरस्कार

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताक दिन 2022 चे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करंडक विजेत्या पाेलिस प्रशिक्षण संस्था घाेषित करण्यात आल्या आहे. यात सन 2020-21 या वर्षासाठी अराजपात्रित अधिकारी या श्रेणी अंर्तगत सर्वात्कृष्ट पाेलिस प्रशिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य पाेलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्र,पुणे यांना राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय गृहमंत्री करंडक 20 लाखाच्या राेख पारिताेषिक रकमेसह घाेषित करण्यात आले.

नुकतेच दिल्लीत केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते महाराष्ट्र पाेलिस बिनतारी विभागास पाेलिस अनुसंधान आणि विकास विभागाच्या 52 व्या स्थापना दिन समारंभात ही ट्राॅफी देण्यात आल्याची माहिती पाेलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने साेमवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पाेलिस विभागाचे वतीने पाेलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक व अपर पाेलिस महासंचालक रितेश कुमार यांंनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. यापूर्वी देखील सन 2018-19 मध्ये महाराष्ट्र राज्य पाेलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्रास अराजपात्रित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण श्रेणी अंर्तगत असलेल्या प्रशिक्षण संस्थेत सर्वाेत्कृष्ट पाेलिस प्रशिक्षण संस्थांसाठी विभागीय स्तरावरील (पश्चिम) केंद्रीय गृहमंत्री करंडक व दाेन लाख रुपयांच्या राेख पारिताेषिकाने गाैरविण्यात आले हाेते.

महाराष्ट्र पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, हे महाराष्ट्र पोलिस दलाकरिता तांत्रिक प्रशिक्षणाचे एकमेव प्रशिक्षण केंद्र असून ते पोलीस बिनतारी मुख्यालय स्थित आहे. पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन 1967 मध्ये झाली असून, त्यामध्ये सन 2016 पासून आजपर्यंत चार हजार पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व अंमलदार यांना बिनतारी दळणवळण माहिती तंत्रज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित केले गेले आहे.या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध संवर्गाच्या नवप्रवीष्ठ अधिकारी व अंमलदार यांना मुलभूत पाठ्यकरम प्रशिक्षण तसेच आगामी तंत्रज्ञान ई-गव्हर्नन्स, अॅडव्हान्स सायफर कोर्स आणि रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स असे सेवांतर्गत प्रशिक्षण पोलिस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांना नियमितपणे दिले जाते.प्रशिक्षण केंद्र परिसरमध्येच सर जे. सी. बोस ई-लर्निंग सेंटर अत्याधुनिक सुविधांसह अत्याधुनिक व्हर्च्यूअल क्लासरूम ज्यामध्ये ऑनलाइन मोडमध्ये रिमोट ऍक्सेस सुविधेसह प्रगत कॉन्फरन्स रूम आणि ऑफ-लाइन मोड व रेकॉर्डिंग सुविधेसह स्थापित करण्यात आली आहे.मुख्यालयामध्येच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज अशा डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन हबची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये दळणवळण, आयटी आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि संशोधन कार्यासाठी 10 वेगवेगळ्या विशेष प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली आहे.

वीज बिलात 15 लाखांची बचतमहाराष्ट्र पोलीस बिनतारी मुख्यालय परिसरातील सर्व इमारतीकरिता एकूण 92 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पा द्वारे विद्युत पुरवठा केला जातो. ज्यामुळे या इमारतींकरिता येणाऱ्या वीज बिलामध्ये प्रतिवर्षी सुमारे रु. 15 लाख इतकी बचत होते.महाराष्ट्र पोलीस बिनतारी मुख्यालय परिसरामध्येपर्जन्य जल पुनर्भरण ( रेन वॉटर हार्वेस्टिंग ) प्रकल्प राबविण्यात आला असून त्यामध्ये सर्वसाधारण 4 कोटी लीटर्स पावसाचे पाणी साठवून भूजल पातळीचे पुनर्भरण करण्यासाठी उपयोग केला जातो.महाराष्ट्र पोलीस बिनतारी मुख्यालय परिसरामध्येकंपोस्ट निर्मूलन व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात आली असून त्यामध्ये जैव कचरा कंपोस्टद्वारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते.

बातम्या आणखी आहेत...