आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी प्रकरण:करुणा शर्मा चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटक होण्याची शक्यता

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करून संबंधित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह करुणा शर्मा ह्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा साहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री मुंबई येथून करुणा शर्मा यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले असून अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगतिले.

गुन्हा दाखल

अजयकुमार विष्णू देडे , करुणा शर्मा असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नांजली अजयकुमार देडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 30 मे या कालावधीत घडला आहे.

मानसिक त्रास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अजयकुमार देडे यांची काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. दरम्यान, देडे यास पत्नीपासून घटस्फोट पाहीजे होता. त्यानंतर फिर्यादीचा पती व करुणा शर्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, करुणा शर्मा यांनी फिर्यादीस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दोघांनीही फिर्यादीने घटस्फोट द्यावा, यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने फिर्यादीसमवेत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवून त्यांना मानसिक व शारिरीक त्रास दिला, अशी माहिती फिर्यादीने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...